आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती वृत्त:हिंगोलीत ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील नांदेड नाका भागात भरधाव ट्रकच्या पाठीमागील चाकात ज्येष्ठ नागरिकाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. शेख मुन्नू शेख इब्राहिम (रा.हिंगोली ) असे मृताचे नाव आहे.

वाशिमकडून एक ट्रक शहरातील मुख्य रस्त्यावरून औंढा नागनाथकडे जात होता. सकाळी ११ वाजता नांदेड नाका भागात आल्यानंतर चालकाने ट्रक औंढा रोडकडे वळवला. या वेळी तेथून जाणारे शेख मुन्नू हे ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले.