आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रॅक्टरच्या धडकेने एकाचा मृत्यू; ट्रॅक्टरचालक फरार

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगाव शिवारात भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. विजय निवृत्ती धाबे (४५, रा. खरबी) असे मृताचे नाव आहे.

हिंगोली येथील गुलशर पठाण व विजय धाबे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेलुरा येथे बांधकामासाठी जात होते. त्यांचे दुचाकी वाहन कलगाव शिवारात आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. या वेळी विजय धाबे हे लघुशंकेसाठी जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने (एमएच ३८ व्ही २७६०)ने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात धाबे गंभीर जखमी झाले. मात्र अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला. या वेळी गुलशर पठाण व इतर गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या धाबे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुलशर पठाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...