आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातांची मालिका सुरुच:हिंगोलीत भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू; ट्रॅक्टर चालक फरार, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगाव शिवारात भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. विजय निवृत्ती धाबे वय 45 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील गुलशर पठाण व विजय धाबे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर शुक्रवारी ता. 3 सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेलुरा येथे बांधकामासाठी जात होते. त्यांचे दुचाकी वाहन कलगाव शिवारात आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. यावेळी विजय धाबे हे लघुशंकेसाठी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्र.एमंएच-38-व्ही-2760) यांना जोराची धडक दिली. या अपघातात विजय गंभीर जखमी झाले. मात्र अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला.

यावेळी गुलशर पठाण व इतर गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या धाबे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी गुलशर पठाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक आर.एन. मळघने, उपनिरीक्षक एस. एम. मुपडे, जमादार अशोक धामणे, गजानन पोकळे, आकाश पंडीतकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...