आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी ते हिंगोली मार्गावर मसोड फाटा येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. संजय यल्लप्पा बाभूळकर असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका हिंगोली ते कळमनुरी या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या रस्त्यावर मागील काही दिवसांत वाहने सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. मागील ८ दिवसांतच ५ अपघात या मार्गावर झाले. त्यामुळे वाहनचालकांनी या महामार्गावर वेगमर्यादा पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसवड येथील संजय बाभूळकर, शिवाजी बाभूळकर, अरबाज पठाण, करण तावडे हे आज सकाळी चार वाजण्याच्या सुमारास मसोड येथून ट्रॅक्टरने कळमनुरीकडे कामासाठी येत होते. या वेळी मसोड फाट्याजवळ भरधाव धावणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटले. या अपघातात संजय बाभूळकर (१९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवाजी बाभूळकर, अरबाज पठाण व करण तावडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरातील शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार रोहिदास राठोड, गुहाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृत संजय बाभूळकर याच्यावर कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.