आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्ह्यात अपघात:राजदरी पाटीजवळ भरधाव ऑटो उलटून एक जण ठार, दोघे जण गंभीर जखमी

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी पाठीवर भरधाव ऑटो उलटून एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. 2) दुपारी दोन वाजता घडली. साहेबराव देवबा बंदुके (४७, रा.लाख) असे मयत प्रवाशाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असोला तर्फे लाख येथील साहेबराव बंदुके, विजयमाला शिवाजी कराळे, बालाजी भिमराव ससाने हे तिघेजण आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नांदापूर रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी ऑटोने निघाले होते. ऑटो राजदरी पाटी जवळ आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ऑटो उलटला. या अपघातात साहेबराव बंदुके ऑटो खाली घासत गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजयमाला शिवाजी कराळे आणि बालाजी भीमराव ससाने गंभीररीत्या जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच कळमदूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष वराडे, सुनील रिठे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. साहेबराव बंदूके यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...