आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील घरफोडीच्या टोळीतील एकास अटक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोनाजी चंपत्ती शिंदे (२५) असे त्याचे नाव आहे. त्याने आखाडा बाळापुरातील ४, तर वसमत तालुक्यातील २ घरफोड्यांची कबुली दिली. कुरुंदा परिसरातील बागलपार्डी भागातील सोनाजी चंपत्ती शिंदे याच्यासह अन्य काही जणांनी गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या पथकाने त्यास अटक केली. या प्रकरणात जाकी चव्हाण, मांगीलाल श्रीरंग राठोड ऊर्फ भोसले, विकास श्रीरंग राठोड ऊर्फ चव्हाण, नीलेश बबरसिंग राठोड, दत्ता मांगीलाल राठोड ऊर्फ भोसले, सतीश गणपत राठोड, बाबूराव भावजी चव्हाण (रा. हिमायतनगर) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...