आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:शेवाळा येथे एकाचा भोसकून खून; गावकऱ्यांचा रास्ता रोको

हिंगाेलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे घडली. गौतम नरवाडे (५२) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आखाडा बाळापूर ठाण्यासमोर रास्ता रोको केले.

शेवाळा नाक्यावरील हॉटेलमध्ये काही जण चहा घेत होते. तेथे गौतम नरवाडेही होते. गावातील शेख मुस्तफा शेख जिलानी (२२) तेथे आला. त्याने काही कळायच्या आत गौतम नरवाडे यांच्या पोटात चाकूने तीन वार तसेच गळ्यावर वार केले. या हल्ल्यात गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर तरुण शेख मुस्तफा रिक्षा थांब्यावर येऊन उभा राहिला.

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर ठाण्याचे सपोनि पंढरीनाथ बोधनपोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी शेख मुस्तफा यास ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणावरून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शेवाळा गावकरी पोलिस ठाण्यात जमले. त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकऱ्यांनी बाळापुरात रास्ता रोको सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...