आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी येथे दोन मित्रांनी मिळून एका तरुणाचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना मंगळवारी (१४ जून) पहाटे दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. निकेश कांबळे (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अभिजीत म्हस्के, आकाश सातव या दोन मित्रांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
कळमनुरी शहरालगत हिंगोली मार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यावरून कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार लक्ष्मण कऱ्हाळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, जगताप यांच्या पथकाने पहाटे दोन वाजता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाचा गळा आवळल्याचे दिसून आले तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले. तो मृतदेह साईनगर भागातील निकेश कांबळे याचा असल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.