आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:महिलेवर अत्याचार; आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक निलंबित

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील एका महिलेस फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तसेच छायाचित्र काढून अत्याचार करणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक मारोती कोटकर यास निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी नुकतेच काढले. वाघजाळी येथे एका महिलेस “मी तुमचा नातेवाईक आहे,’ असे सांगून त्यांच्या कुटुंबीयांसोबत जवळीक साधली. त्यानंतर त्या महिलेचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढून धमकी देऊन अत्याचार केला. १ एप्रिल रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...