आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत गांजाची 50 झाडे जप्त:वसई शिवारातील शेतात पोलिसांची कारवाई; परिसराची घेणार झाडाझडती

हिंगोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोला औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 6) दुपारी एक वाजता गांजाची 50 झाडे जप्त केली. या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या गांजाचे वजन 11 किलो असून, 500 ग्रॅम वाळलेला गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे.

सकाळी अकरापासून कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील एका शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, किशोर सावंत, शंकर जाधव, आकाश टापरे, शंकर ठोंबरे, शेख जावेद यांच्या पथकाने आज सकाळी अकरा वाजल्यापासूनच वसई शिवार पिंजून काढला.

झाडे उपटूनन मोजले वजन

त्यानंतर एका शेतात भाजीपाल्याच्या पिकांमध्ये गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची झाडे मोजली असता लहान-मोठी सुमारे 50 झाडे आढळून आली आहेत. पोलिसांनी सदरील झाडे उपटून त्याचे वजन करण्यास सुरुवात केली असून, या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांची चौकशी सुरू

गांजाच्या झाडांचे वजन केल्यानंतरच त्याचे वजन किती किलो अन किती रुपये किंमत असेल हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका शेतकऱ्याचीही चौकशी सुरू केली असून या परिसरात आणखी काही शेतात गांजाची लागवड केली आहे काय याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...