आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासीना शिवारात जुगार अड्ड्यावर छापा:5 दुचाकी, 8 मोबाईलसह 3.86 लाखांचा ऐवज जप्त; 10 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली | प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील लासीना शिवारात पांदण रस्त्याच्या बाजुला मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ दुचाकी, ८ मोबाईलसह ३.८६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील लासीना शिवारात पांदण रस्त्याच्या बाजुला मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार कैलास सातव, व्हडगीर, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्यासह पथकाने रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये दहा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. मात्र, पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण फरार झाले. पोलिसांना सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ दुचाकी, ८ मोबाईल व २४ हजार रुपये रोख असा ३.८६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश घुगे, फकीरा दराडे, सतीष घुगे, चंद्रभान घुगे (सेलसुरा), अशोक मुंडे (हिवराबेल), अनिल ढाले (बोरीशिकारी), तानाजी जाधव, रामेश्‍वर खेडेकर (लासीना), संतोष सोनुने (कळमनुरी) यांच्या विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार व्होडगिर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...