आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:हिंगोलीत स्वस्त धान्याच्या संशयावरून 197 पोती तांदूळ पोलिसांनी पकडला

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्वस्त धान्याच्या संशयावरून १९७ पाेती तांदूळ गुरुवारी पोलिसांनी जप्त केला. तसेच अन्य २०० पोती तांदूळ लोहगाव येथे उतरवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

हिंगोली शहरात औद्योगिक वसाहतीमध्ये दोन आयशर टेम्पोमध्ये स्वस्त धान्याचा तांदूळ आणण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार महेश बंडे, मंडलिक, खोडवे, दांडेकर, सुमीत मोडक, वाढवे, चिपडे यांच्या पथकाने आज सायंकाळी औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामावर छापा टाकला. यात स्वस्त धान्याचा १९७ पोती तांदूळ आढळला. याशिवाय त्या परिसरातच असलेल्या एका आयशर टेम्पोचीही पोलिसांनी तपासणी केली असता त्यात स्वस्त धान्याची रिकामी २०० पोती आढळून आली. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने हा तांदूळ लोहगाव येथे उतरवला असल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...