आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत दसरा महोत्सवात कॅमेरे वाढविले:सीसीटीव्हीच्या सहाय्याने 15 रोडरोमियोंना पोलिसांनी दिली समज; साध्या वेशातील 25 पथके तैनात

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील ऐतिहासीक दसरा महोत्सवात बसविण्यात आलेले सीसीटीव्हीचे फुटेज तपासून 15 जणांना पोलिसांनी समज दिली असून महोत्सावातील वाढती गर्दी लक्षात घेता 25 कॅमेरे बसविण्यात आले आहे. या शिवाय साध्या वेशातील 25 पथकेही तैनात करण्यात आले असून तरुणी व महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे.

ऐतिहासीक दसरा महोत्सवात गर्दी वाढू लागली आहे. मागील दोन दिवसांत सुमारे 20 हजार पेक्षा अधिक नागरीक दसरा महोत्सवातील कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये येऊ लागले आहेत. या गर्दीचा गैरफायदा घेऊन पाकीटमारी करणे तसेच छेडछाड करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रदर्शनीच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची दररोज सकाळी तपासणी केली जात आहे. या फुटेजमध्ये आता पर्यंत 15 जण छेडछाडीचा प्रयत्न करतांना आढळून आले असून पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना समज दिली आहे. त्यानंतर रविवारपासून ता. 3 महोत्सवात आणखी 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यासाठी सायबर सेलचे तीन पथके स्थापन केली आहेत.

या शिवाय महोत्सवामाध्ये साध्या वेशातील 25 चिडीमार पथके तैनात करण्यात आली असून संसारोपयोगी साहित्याच्या खरेदीच्या दुकानाच्या परिसरात तसेच आकाश पाळण्याच्या परिसरात हि पथके तैनात असणार आहेत. महिला व तरुणींची छेड काढतांना आढळून आल्यास त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दामिनी पथकाकडून एका जणावर कारवाई

दसरा महोत्सवात तैनात असलेल्या दामीनी पथकातील पोलिस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, आरती साळवे, शारदा ढेंबरे, नंदा धोंगडे यांच्या पथकाने एका तरुणास पकडले. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...