आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळमनुरीत मित्रांकडूनच तरुणाचा खून:दोन मित्रांनीच खून केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट; पोलिसांनी लावला 10 तासांतच छडा

हिंगोली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथे एका तरुणाचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना मंगळवारी ता. 14 उघडकीस आली. या प्रकरणात कळमनुरी पोलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा तासात पोलिसांनी दोघां संशयात तरूणांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी निकेश कांबळे याच्या खून प्रकरणात दोन मित्रांनाच रात्री ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनूरी शहरालगत हिंगोली मार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे जमादार लक्ष्मण कऱ्हाळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, जगताप यांच्या पथकाने पहाटे दोन वाजता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाचा गळा आवळल्याचे दिसून आले तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह साईनगर भागातील निकेश कांबळे याचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात निकेश कांबळे यांची आई कांचन कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. या प्रकारात पोलिसांनी दिवसभरात निकेशच्या पंधरा ते वीस मित्रांची चौकशी केली. त्यानंतर रात्री नऊ वाजता त्याच्या दोन मित्रांनी खुनाची कबुली दिली. मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरून त्याचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्या दोन मित्राला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...