आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू:राज्यातील 9732 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील 9732 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार सोमवारपासून विशेष ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात आले आहे.

राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती आहेत. यामध्ये जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या 1993 तसेच मे 2022 ते डिसेंबर 2022 या कालावाधीत मुदत संपणाऱ्या 7638 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या शिवाय निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत ता. 29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या कार्यक्रम योग्यरित्या न राबविल्यामुळे संपूर्ण निवडणुक कार्यक्रम रद्द केलेल्या 101 ग्रामपंचायती अशा 9732 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सोमवारपासून विशेष ग्रामसभा
राज्यात निवडणूक घेतल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीमधून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवा व मंगळवारी विशेष ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 9 जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाणार असून ता. 9 जून ते ता.13 जून या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर ता. 16 जून रोजी उपविभागीय अधिकारी या हरकती व सूचनांवर अभिप्राय देणार असून ता. 20 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचनेला मान्यता देऊन ता. 21 जून रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दीला देण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...