आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्ह्यातील 123 पोलिस नाईक झाले जमादार:पोलिस अधीक्षकांचे पदोन्नतीचे आदेश, 8 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

प्रतिनिधी | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील १२३ पोलीस नाईक यांना पोलीस जमादार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यासोबतच १६ जमादारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी शुक्रवारी काढले.

हिंगोली जिल्हा पोलिस दलामध्ये मागील काही दिवसांत खुल्या प्रवर्गातून पदोन्नतीचे आदेश काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याची सूचना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्यांमधून पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली होती.

त्यानुसार आज पोलीस दलातील १२३ पोलीस नाईक यांना जमादार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये आठ महिला पोलीस कर्मचारी तर सुमारे दहा वाहन चालकांचा समावेश आहे.

यासोबतच पोलीस जमादार असलेल्या १६ कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी काढले आहेत.

या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

दरम्यान, जमादार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कैलास बलदरे, सुदाम राठोड, रामेश्वर मिसाळ, शालिग्राम अंभोरे, किशन चव्हाण, सुनील कांबळे, बालाजी केंद्रे, बालासाहेब कल्याणकर, शेख हकीम, संजय वाढवे, संतोष वाठोरे, गुलाब खरात, रोहिदास राठोड, विजय शुक्ला, शेषराव पोले यांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर, प्रभारी गृह पोलिस उपाधीक्षक वैजनाथ मुंडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...