आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीचा निषेध:हिंगोलीत पेट्रोल पंपावर केक कापून इंधन दरवाढीचा निषेध, राष्ट्रवादीकडून आंदोलन

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने लागू केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने हिंगोलीत शुक्रवारी ता.1 दुपारी पेट्रोल पंपावर केक कापून आंदोलन केले. यावेळी पंतप्रधानाचा विकासाचा एप्रिल फूल दिवस असा फलकही लावण्यात आला. येथील इंदिरा गांधी चौकातील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी माधव कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, योगेश डहाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधानांनी दाखविलेले अच्छे दिनचे स्वप्न पार धुळीस मिळवले असून वारंवार होणारी इंधन दरवाढ सर्वसामान्यांसाठी अडचणीत ठरू लागली आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीची कामेही ठप्प होऊ लागली आहेत. शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दिवस एप्रिल फुल असे फलक घेऊन त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्र शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...