आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात बेकायदा धर्मांतरण अन् लव्ह जिहाद प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्मरक्षणासाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. हिंगोलीत आज सकाळीच महात्मा गांधी पुतळ्या मुक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर महिलांच्या एका शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.