आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:बापाच्या नावाच्या जागी बाळासाहेबांचे नाव लावा, शिवसेना नेते जाधव यांचे हिंगोली शहरात आव्हान

हिंगोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी त्यांच्या बापाच्या नावाच्या जागेवर बाळासाहेबांचे नाव लावावे, असे आव्हान शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सोमवारी (१२ सप्टेंबर) हिंगोली येथे केले. महात्मा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात आला या वेळी ते बोलत होते.

या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, डॉ. संतोष टारफे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना जाधव म्हणाले की, ४० गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला. केवळ आपले पाप लपवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...