आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.५३ टक्के लागला आहे. जिल्ह्यात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात मुली पास होण्याचे प्रमाण ९४.८१ टक्के आहे. तर, ९२.५९ टक्के मुले पास झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. हिंगोली जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी १३, १६५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२, ३१४ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये २१०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले असून ६०७३ विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ३८७२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ७५९९ मुलांपैकी ७०३६ मुले पास त्यांची टक्केवारी ९२.५९ टक्के आहे. तर, ५५५९ पैकी ५२८० मुली पास झाल्या असून त्यांची टक्केवारी ९४.८१ टक्के आहे. त्यामुळे यावर्षीही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
यशाची परंपरा कायम
बारावी परीक्षेच्या निकालात हिंगोली जिल्ह्याने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील १६ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेत ५५११ विद्यार्थ्यांपैकी ५३८० विद्यार्थी पास झाले असून निकाल ९७.६२ टक्के, कला शाखेत ६५७४ पैकी ५९५३ विद्यार्थी पास झाले असून निकाल ९०.५५ टक्के, वाणिज्य शाखेतील ७५७ विद्यार्थ्यांपैकी ७०६ विद्यार्थी पास झाले असून निकाल ९३.२६ टक्के, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात ३२६ पैकी २७७ विद्यार्थी पास झाले असून निकाल ८४.९६ टक्के लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.