आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पावसाळ्यात 1700 गावांचा मार्ग बिकट!

हिंगाेली | मंगेश शेवाळकर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून केली जाणारी ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांची तब्बल १७०० कामे अपूर्ण असून आता पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

आठ जिल्ह्यांतून जि. प. बांधकाम विभागामार्फत ग्रामीण मार्ग तसेच इतर जिल्हा मार्गाची दुरुस्ती, मजबुतीकरण व नवीन रस्त्याची कामे केली जातात. जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो.

दरम्यान, इतर जिल्हा मार्ग वगळून ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीमध्ये ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत मराठवाड्यात १६५६ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ५८२ कामेच पूर्ण झाली. उर्वरित १०७४ कामे अपूर्ण आहेत. मराठवाड्यात कामे पूर्ण करण्याची टक्केवारी केवळ ३५ टक्के एवढी आहे. यासोबतच ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणांतर्गत इतर जिल्हा मार्गांची १०४८ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी केवळ ३२८ कामेच पूर्ण करण्यात आली.

दैना - मराठवाड्यात जिल्हा परिषदांकडून होणाऱ्या रस्त्यांची कामे रखडली; खते, बियाण्यांची वाहतूक करणेही होणार कठीण

आठपैकी चार जिल्ह्यांचे काम असमाधानकारक
मराठवाड्यात केवळ ३१ ते ३५ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, हिंगोली व उस्मानाबादच्या कामांची प्रगती असमाधानकारक असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली व ग्रामीण भागातून मंजूर झालेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...