आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:हिंगोलीच्या दांडेगावात घराचे कुलूप तोडत चोरी, 2 लाखांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दांडेगाव येथे घराचे कुलूप तोडून आज प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दांडेगाव येथील नितीन साळुंके हे गुरुवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी साळूके कुटुंबीय झोपलेल्या खोलीच्या दरवाजा बाहेरून साडीने बांधून टाकला. त्यानंतर चोरट्यांनी कपाट असलेल्या खोलीमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी असलेल्या चावीने कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी जाताना साडीने बांधलेल्या दरवाजा सोडला.

दरम्यान पहाटे साडेचार वाजता साळुंके हे शेतात जाण्यासाठी उठले असताना त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यांनी कपाटाच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता कपाटही उघडे दिसले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे शिवाजी बोंडले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळावर चोरट्यांची कुठलेही साहित्य सापडले नाही. चोरी करून जाताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे तोडलेले कुलूपही सोबत नेले.

दरम्यान चोरी गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे लॉकेट, कानातले, अंगठी आदीचा समावेश आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपनिरीक्षक वाघमारे पुढील तपास करीत आहेत.