आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगर Vs ठाकरे गट:अयोध्या दौऱ्यावरुन राक्षस आमच्यावर टीका करताय; आमदार संतोष बांगरांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायणातही राक्षस होते अन आताही असलेले राक्षस आमच्या दौऱ्यावर टीका करीत आहे, मात्र त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यात आम्हाला वेळ नाही, आम्ही आमच्या ताकदीवर श्रीरामाचा धनुष्य आयोध्येत घेऊन आलो असल्याचे शिवसेनेचे (शिंदेगट) आमदार संतोष बांगर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास वेळ नाही

आमदार बांगर म्हणाले की, अयोध्या दौऱ्यामुळे आमच्यावर टीका केली जात आहे. मात्र त्यांची टीका निरर्थक आहे. या राक्षसांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आम्हाला वेळ नाही. सन 2024 च्या निवडणुकीत आम्ही या धनुष्यबाणाने विरोधकांना जागा दाखवून देऊ असे ते म्हणाले. रामराज्य कोणते होते हे सर्व सामान्य जनताच विरोधकांना दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही. देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसणाऱ्यांनी आम्हाला रामराज्य शिकवू नये अशी टिकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे. अयोध्या येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे टीकास्त्र डागले.

आम्हीच खरे हिंदुत्ववादी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावर टीका केली असल्याच्या प्रश्‍नावर बोलतांना ते म्हणाले की, खासदार राऊत यांना काही काम उरलेले नाही. त्यामुळे ते सतत इतरांवर टीका करीत असतात. खरे हिंदुत्ववादी आम्हीच आहोत असे शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) म्हटले जाते. यावर बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरात दंगल झाल्यानंतर काही दिवसांतच शिवसेना पक्षप्रमुखांची तेथे सभा झाली. मात्र त्या सभेत त्यांनी या दंगलीबद्दल एक शब्दही काढला नाही. त्यावरून खरे हिंदूत्ववादी कोण हे जनतेला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीसांच्या काळात शेतकरी सुखी

राज्यातील शेतकरी अडचणीत असतांना अयोध्या दौरा काढणे चुकीचे असल्याची टीका करणाऱ्याबद्दल बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.