आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:सरपंचाला 30 हजारांची लाच घेताना केली अटक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथे पोल्ट्रीफॉर्म टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजारांची लाच घेताना सरपंचाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (४ ऑक्टोबर) दुपारी रंगेहाथ पकडले. ओम कदम (रा. वारंगा फाटा) असे सरपंचाचे नाव आहे.

नांदेड येथील एका व्यक्तीस वारंगा फाटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म उभारायचे होते. त्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्‍यक होते. त्यामुळे तक्रारदाराने वारंगा फाटा येथील सरपंच ओम कदम यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र त्यासाठी सरपंच कदम याने ३० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम आज वारंगा फाटा येथे देण्याचे ठरले होते. लाचलुचपतचे उपअधीक्षक नीलेश सुरडकर, पोलिस निरीक्षक विजय पवार, प्रफुल्ल अंकुशकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक सय्यद युनूस, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, विजय शुक्ला, महिला पोलिस कर्मचारी योगिता अवचार यांच्या पथकाने आज दुपारी वारंगा फाटा येथे सापळा रचला. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...