आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन रोडरोमिओंना जमावाने बेदम चोपले:हिंगोलीमध्ये विद्यार्थिनींची काढली छेड; तिघांना चोप

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते औंढा मार्गावर दिग्रस पाटीजवळ विद्यार्थिनींची छेड करणाऱ्या तीन रोडरोमिअोंना जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथून शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर काही विद्यार्थिनी मानव विकास मिशनच्या बसने औंढा नागनाथकडे निघाल्या होत्या. यावेळी लिंबाळा येथून एका दुचाकीवर असलेल्या तीन रोडरोमिअोंनी दुचाकीवर येत बसचा पाठलाग सुरू केला. बस जवळ गेल्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना अश्लील टोमणे मारले. विद्यार्थिनींनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. दरम्यान, डिग्रस पाटीजवळ विद्यार्थिनी बसमधून खाली उतरल्यानंतर तिघांनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने त्यांना बेदम झोडपले. याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आर.एन.मळघने, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार अशोक धामणे, आकाश पंडितकर, संतोष वाठोरे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुचाकी वरील तिघांना ताब्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर विद्यार्थिनी व जमावदेखील पोलिस ठाण्यात आला. मागील चार ते पाच दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात एका तरुणीच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सय्यद नफीस सय्यद अली, सुमेर सय्यद रहीम, शेख समीर शेख कदीर ( सर्व रा. लिंबाळा) यांच्याविरुद्ध विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...