आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण:हिंगोलीत शाळा सजल्या, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी रंगीबेरंगी फुले, फुग्यांनी शाळा सजल्या होत्या. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याही आनंदालाही उधाण आल्याचे चित्र आज शाळांमध्ये दिसले.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद व खाजगी शाळांची संख्या सुमारे ११५० एवढी आहे. आज सकाळी बहुतांश शाळांमध्ये मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रंगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या शिवाय शाळेचे प्रवेशद्वार फुले व फुग्यांनी सजविण्यात आले होते. सकाळी विद्यार्थी शाळेत येताच उपस्थित शिक्षकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अतिशय अल्हाददायक वातावरणामुळे विद्यार्थीही भारावून गेले होते. तर विद्यार्थ्यांनी सुट्टीत केलेली धम्माल एकमेकांना सांगितली. पहिल्याच दिवशी शाळांमधून पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. नवीन पुस्तक, उत्साहात होणारे स्वागत यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

दरम्यान, सोमवारीच शाळांमध्ये उपस्थित राहून शिक्षकांनी स्वच्छता व इतर कामे पूर्ण करुन घेतली. शाळेचा परिसर स्वच्छ करणे, वर्गात साफसफाई व आवश्यक तेथे बेंचची दुरुस्ती करण्यात आली. सोमवारीच विद्यार्थ्यांसाठी शाळा सज्ज करण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...