आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:सेनगावमध्ये टेम्पोच्या धडकेने जेष्ठ नागरिकाचा पाय निकामी; नांदेडमध्ये उपचार सुरू

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगावमध्ये टेम्पोच्या धडकेने एका जेष्ठ नागरिकाचा पाय निकामी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली आहे. अंबादास चौधरी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण येथील अंबादास चौधरी हे आज दुपारी सेनगाव येथे आठवडी बाजारासाठी आले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके घेऊन एक टेम्पो सेनगाव येथे आला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टेम्पोतील पुस्तके उतरविण्यासाठी चालकाने टेम्पो मागे घेण्यास सुरुवात केली. मात्र, याचवेळी अंबादास चौधरी यांचा पाय टेम्पोच्या चाकाखाली आला. या अपघातात पायाचा चेंदामेंदा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. व्ही. भोईटे, जमादार महादू शिंदे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून चौधरी यांना उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...