आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:यांत्रिकी पद्धतीनेच होणार सेप्टिक टँक स्वच्छता; तीन महिन्यांत यंत्रांची खरेदी

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • सफाई कामगारांना दिलासा - राज्यातील ३६८ पालिकांमध्ये होणार अंमलबजावणी

राज्यात आता यांत्रिकी पद्धतीने सेप्टिक टँक व मलजल वाहिन्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत यंत्रांची खरेदी करावी, अशा स्पष्ट सूचना पालिकांना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान किंवा वित्त आयोगाच्या निधीतून ३६८ पालिकांमधून यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये किमान ३० हजार घरांमध्ये सेप्टिक टँकचा वापर होतो. त्यामुळे सफाई कामगारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

केंद्र शासनाने ६ डिसेंबर २०१३ पासून हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांचे पुनर्वसन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक व मलजल वाहिन्यांची स्वच्छता यांत्रिक उपकरणाद्वारे करावी लागणार आहे. याबाबतचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा मैला हाताळणीशी संबंध येणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील ३६८ स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक, मलजल वाहिन्यांची संपूर्ण यंात्रिकी पद्धतीने स्वच्छता करावी. त्यासाठी पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत यंत्रांची खरेदी करावी. तीन महिन्यांनंतर सेप्टिक टँक, ड्रेनेजची स्वच्छता केवळ यांत्रिकी पद्धतीने करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, असेही सूचनापत्रात म्हटले आहे

वित्त आयोगाकडून निधी सफाई कामगारांना सेप्टिक टँकमध्ये धोकादायक प्रवेश संपूर्णपणे प्रतिबंधित करून हाताने मैला हाताळण्याच्या पद्धतीची समाप्ती करावी, यांत्रिकी साधने व सुरक्षा उपकरणांची खरेदी करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (नागरी) किंवा वित्त आयोगाच्या निधीचा वापर करावा तसेच ही खरेदी शासनाच्या नियमानुसारच करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्येही उपकरणांची खरेदी होणार आहे.

सफाई कामगारांना प्रशिक्षण देण्याच्या शासनाने दिल्या सूचना स्वच्छतेशी निगडित सफाई कामगारांना शास्त्रोक्त प्रशिक्षण द्यावे तसेच त्यांची नियमित क्षमता बांधणी करण्यात यावी. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाचा जलकल्याण योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच या व्यवसायात कार्यरत सफाई कामगारांना कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. यंत्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी त्यांचा योग्य वापर करण्यासाठी एखाद्या संस्थेसोबत पाच वर्षांचा करार करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

नागरिकांच्या मदतीसाठी १४४२० हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सेप्टिक टँकची स्वच्छता करण्यासाठी नागरिक सहकार्य करतील किंवा स्वतःहून पुढाकार घेतील यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी १४४२० हा हेल्पलाइन क्रमांक चालू केला आहे. यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या. स्वच्छतेसाठी स्टँडर्ड सेप्टिक टँक व्हेइकल, कॅमेरा अप्रॅटस, हायड्रो जेटिंग मशीन, पॉवर बकेट मशीन, नायलॉन दोरी, गॅस मॉनिटर, ब्रीथिंग अप्रॅटस, सेफ्टी बॉडी सेट, गॅस मास्क यासह इतर साहित्य खरेदी केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...