आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली क्राईम:वसमतमध्ये पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन; 7 तलवारी जप्त, 10 वर्षांपासून बेपत्ता असलेला आरोपी ताब्यात

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत शहरात पोलिसांनी केलेल्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये शनिवारी ता. १९ पहाटे तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एक जण मागील दहा वर्षापासून पोलिसांना हवा होता. यामध्ये पोलिसांनी सात तलवारी देखील जप्त केल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये गुलाबसिंग भुऱ्यासिंग चव्हाण, रणजितसिंग रतनसिंग चव्हाण यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरात मागील काही दिवसांत गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शहरात अचानक कोम्बींग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला होता. त्यानुसार पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक किशोर कांबळे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार शेख नय्यर, भगीरथ सवंडकर, कृष्णा चव्हाण, बालाजी मिरासे, शंकर हेंद्रे, शेख हकीम, दिलीप पोले, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे, महिला पोलिस कर्मचारी मगर, शेख आसेफ यांच्या पथकाने मध्यरात्री पासून कोम्बींग ऑपरेशन सुरु केले.

यामध्ये पोलिसांनी पहाटे तीन वाजे पर्यंत शहरातील विविध भागात पथके पाठवून गुन्हेगारांची माहिती घेतली. यामध्ये हट्टा पोलिसांना एका गुन्हयात मागील दहा वर्षापासून हवा असलेला गुलाबसिंग भुऱ्यासिंग चव्हाण पोलिसांच्या हाती लागला. या शिवाय पोलिसांनी रणजितसिंग रतनसिंग चव्हाण याच्याकडून सात तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच पोलिसांनी देशीदारुच्या बाटल्या व दोन बॉक्स जप्त केले आहेत. या शिवाय अन्य एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...