आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमडीएस नीट परीक्षा:हिंगोलीच्या डॉ. शगुन सोनीने मिळविला देशात 266 वा क्रमांक

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीच्या दंतरोग तज्ञ डॉ. शगुन सत्यनारायण सोनी यांनी एमडीएस नीट परिक्षेत 960 पैकी 645 गुण मिळवून देशात 266 वा क्रमांक मिळविला आहे. ओरल सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.

हिंगोलीच्या हेडगेवार दंत महाविद्यालयाची विद्यार्थीनी डॉ. शगुन सत्यनारायण सोनी यांनी बीडीएस परिक्षेत आपल्या हुशारीचा ठसा उमटवला होता. या अभ्यासक्रमात त्यांनी सर्व परिक्षांमधून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यापीठात राज्यातून चौथा क्रमांक मिळविला आहे. बीडीएस परिक्षेच्या अखेरच्या वर्षापासूनच त्यांनी एमडीएस नीट परिक्षेची तयारी चालवली होती.

एमडीएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्ड दिल्लीच्या वतीने ता. 1 मार्च रोजी एमडीएस नीट परीक्षा घेतली होती. या परिक्षेत देशभरातून बीडीएस पूर्ण झालेले विद्यार्थी सहभागी झाले होते.

या परिक्षेचा निकाल शुक्रवारी ता. 10 जाहीर झाला असून यामध्ये डॉ. शगुन सोनी यांनी 960 पैकी 645 गुण मिळविले आहे. यामध्ये त्यांनी देशात 266 वा क्रमांक मिळविला आहे. एमडीएसमध्ये ओरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. त्यांच्या यशाबद्दल प्राचारर्य डॉ. विवेक चौकसे, डॉ. सत्यनारायण सोनी, पत्रकार तुकाराम झाडे, डॉ. उमा सोनी, डॉ. राशी सोनी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व जिल्ह्यातील डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...