आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली पालखी:‘गण गण गणात बोते’च्या गजरात शेगावच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी (१६ जून) मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. भरपावसातही शेकडो भाविक पालखीच्या स्वागतासाठी हजर होते. गण गण गणात बोते तसेच हरिनामाच्या गजरात निघालेल्या पालखीचे पानकनेरगावात आगमन झाले.

पालखीचा मुक्काम सेनगावला
मराठवाड्यात पालखी दाखल होताच आमदार तानाजी मुटकुळे, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, गटविकास अधिकारी गोरे, नारायण खेडेकर आदींनी पालखीचे स्वागत केले. पालखी सोहळा सेनगाव येथे मुक्कामी थांबणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे.

750 किमी अंतर पायी चालून पालखी जाईल पंढरपुरात 700 पेक्षा अधिक वारकरी दिंडीत झाले सहभागी 08 वाजता सकाळी पानकनेरगावात पालखी दाखल

बातम्या आणखी आहेत...