आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे - भाजप सरकार मस्तीत काम करतेय:महाराष्ट्रातील जनता त्यांची मस्ती उतरविल्या शिवाय राहणार नाही - नाना पटोलेंचा घणाघात

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एकीकडे शेतकरी, तरुणाच्या आत्महत्या होत असतांना दुसरीकडे सरकार मस्तीत काम करीत असून महाराष्ट्रातील जनता त्यांची मस्ती उतरविल्या शिवाय राहणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. 2) येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

हिंगोलीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गोरेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप लोकशाहीला दाबतेय

पटोले म्हणाले, राज्यातील मोठे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात बाहेर राज्यात गेल्याचे भाजपाचे नेते माहिती अधिकार कायद्यात उघड झाल्याचे सांगत आहे. एक एक प्रकल्प बाहेर राज्यात जात असताना लोकशाही व्यवस्थेला दाबून ठेवणारी भाजपची मंडळी माहिती अधिकार कायद्याची भाषा करीत असतील तर त्यांच्या तोंडाला लागायचे नाही.

खोटे बोल पण रेटून..!

पटोले म्हणाले की,भाजप सरकार महाराष्ट्र विरोधी आहे हे जनतेला कळाले आहे. खोटे बोल पण रेटून बोल असा प्रकार सुरु आहे. राज्य सरकार स्वार्थी व अप्पलपोटी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यात तरुणांच्या आत्महत्या

पटोले म्हणाले की, राज्यात शेतीमालाला योग्य भाव नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत. यावर राज्य सरकार बोलण्यास का तयार नाही. राज्य सरकारच कडून जनतेची लुट सुरु असून यातून राज्याची बदनामी होत आहे. मस्तीत राहणाऱ्या या सरकारची राज्यातील जनताच मस्ती उतरवेल.

राजकारण करू नका

पटोले म्हणाले, भारतजोडो यात्रेमध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. या यात्रेचे विरोधकांना राजकारण करू नये. देश तोडणाऱ्यांना देश जोडता येणार नाही अशी टिकाही त्यांनी विरोधकांवर केली. या यात्रेच्या निमित्ताने देश जोडला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...