आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर:हिंगोलीत केंद्र सरकारच्या निषेधार्थ थाली बजावो आंदोलन, इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी

प्रतिनिधी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंधन दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी हिंगोलीत केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आज सकाळी थाली बजाव आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी सभापती फकीरराव मुंडे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वरराव मांडगे, राजू शिंदे, संतोष गोरे, कपिल शेवाळे, राहुल काळे, वैजनाथ कराळे, प्रकाश चौदंते, बलराम चौधरी, शंकर यादव ,अनिल नायक, शुभम चव्हाण, चेतन नागरे, खली बांगर, अनिकेत बांगर, बालाजी बांगर, गोपाळ बांगर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकारी हातात फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हातात थाळी व चमचे घेऊन थाळी वाजवत हे आंदोलन करण्यात आले. नांदेड नाका येथे आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडून थाळ्या वाजवल्या. 'थाली बजाव खुशिया मनावो', असे केंद्र शासनाच्या विरोधात उपहासात्मक नारेबाजी करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार बांगर म्हणाले की, केंद्र शासनाकडून वेळोवेळी पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र शासनाने दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांनीही मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...