आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत शासकीय रुग्णालयातील आयसीयू कक्षच आजारी:उपकरणे ठेवली गुंडाळून, बेडही रिकामेच, रुग्णांमध्ये वाढली चिंता

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
अशी आहे रुग्णालयातल्या बेडची परिस्थिती - Divya Marathi
अशी आहे रुग्णालयातल्या बेडची परिस्थिती

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू कक्षातील उपकरणे वापराअभावी धुळखात पडली असून, कक्षातील बेडवरही धूळ चढली आहे. त्यामुळे आयसीसू कक्षच आजारी असल्याचे दिसू लागले आहे. आता हा कक्ष कधी सुरू होणार याची प्रतीक्षा रुग्णांच्या नातेवाईकांना लागली आहे.

500 रुग्ण उपचारासाठी येतात

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हिंगोली तालुक्यासह सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात विविध आजाराचे दररोज किमान 400 ते 500 रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी काही जणांवर उपचार करून घरी पाठवले जाते तर काही जणांना रुग्णालयात दाखल करुू घेतले जाते. यामध्ये काही गंभीर आजारी रुग्णांचीही समावेश आहे. या रुग्णांसाठी रुग्णालयात आयसीसू कक्ष असणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालयात कक्षच नसल्याने गंभीर आजारी रुग्णांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

रुग्णांचे हाल

दरम्यान, मागील काही दिवसांत रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. तर अपघातामध्ये जखमी होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक असून गंभीर आजारी रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात आयसीयू कक्षच नाही. त्यामुळे हृदयविकार, व इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या रुग्णालयाच्या आयसीसू कक्षाची केवळ पाटीच असून, आतमधील बेडवर मोठी धूळ चढली आहे. या कक्षातील बीपी मॉनीटर मशीन, बायपॅप मशीन, व्हेंटीलेटर व इतर उपकरणे चक्क गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांची यंत्र धुळखात आहेत. आता हिंगोलीच्या रुग्णालयात आयसीयू कक्ष कधी सुरु होणार याची प्रतिक्षा रुग्णांच्या नातेवाईकांना लागली आहे.

लवकरच सहा बेडचे आयसीयू सुरू होणार

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले की, शासकीय रुग्णालयात सहा बेडचे आयसीयू कक्ष सुरू केले जाणार आहे. पुढील एक महिन्यात हा कक्ष सुरू होईल. कोविडमुळे रुग्णांसाठी कक्षातील व्हेंटीलेटर व बायपॅप मशीन्स बाहेर घेण्यात आल्या होत्या. आता आयसीयूची उभारणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...