आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोली शहरात वादळी वाऱ्याने तारांबळ; कॉलेजच्या वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडली तर एका महाविद्यालय वरील पाच खोल्यांची पत्रे उडून गेले आहेत. यामुळे वर्गखोल्या उघड्या पडल्या आहेत.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण सोबतच वारे वाहू लागले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासोबतच पाऊस झाला. या पावसामुळे समोरील वाहनेदेखील दिसणे कठीण झाले होते. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पाच वर्ग खोल्यावरील टीनपत्रे उडून बाजूला पडले. त्यामुळे या वर्गखोल्या उघड्या पडल्या आहेत. वर्गखोल्यांमध्येही पावसाचे पाणी साचले होते. या वादळी वाऱ्यामध्ये महाविद्यालयाचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हळदवाडी येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. सायंकाळी वादळी वाऱ्यात देखील उपोषणार्थी ठाण मांडून होते. या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग होता.

दरम्यान, वादळी वाऱ्यामध्ये एनटीसी विभागातील टेहरे हॉस्पिटलसमोर मोठे झाड वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून खाली पडल्या.

हिंगोली : शहरातील महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांवरील पत्रे उडून नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...