आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट करताना जरा जपून:कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यावर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षक कलासागर यांचा इशारा

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम ठेवावी. कोणत्याही विषयावर आक्षेपार्ह पोस्ट अढळल्यास कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा थेट पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शनिवारी ता. 11 जून रोजी दिला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर होणार कारवाई

यासंदर्भात पोलिस अधिक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन संवेदनशील भागांमध्ये गस्त सुरू करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. तसेच सोशल मीडियावर लक्ष ठेवून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सायबर सेल विभागाने यासाठी सतर्क राहून सोशल मीडियावरील संदेशावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

अफवांना बळी पडू नका

दरम्यान हिंगोली जिल्ह्याला शांततेची परंपरा आहे. शांततेची परंपरा हिंगोली जिल्हा वासियांनी कायम ठेवावी. कुठल्याही अफवांवर तसेच सोशल मीडियावरील धार्मिक भावना दुखणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्याची माहिती तातडीने संबंधित पोलिस ठाण्यांना द्यावी त्यानुसार संबंधित व्यक्तीवर पोलिस कारवाई करतील. मात्र विनाकारण कायदा हातात घेणाऱ्यांची ओरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख पोलिस उपअधीक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथके सतर्क असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...