आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांची सायकल रॅली:शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती अभियान

हिंगोली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिका प्रशासन, योग विद्याधाम समितीच्या वतीने आज सायकल रॅली काढण्यात आली. कडाक्याच्या थंडीमध्येही विद्यार्थी, समितीचे पदाधिकारी व पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरीकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

हिंगोली पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यावर्षी केंद्रस्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी युध्दपातळीवर तयारी केली आहे. त्यासाठी नागरीकांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे प्रयत्न सुुरु आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रमही राबविले जात आहेत.

दरम्यान, नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी पालिका प्रशासन व योग विद्याधाम समितीच्या वतीने आज सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. योगविद्या धाम केंद्रापासून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस पालिकेचे अभियंता रत्नाकर अडशिरे यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे, नगर परिषदचे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकिय अधिकारी शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अभियंता रवीराज दरक, अभियंता काकडे, देविसिंग ठाकूर, आशिष रणशिंगे संदिप घुगे, यांच्यासह योगविद्या धाम समितीचे साधक व माणिक स्मारक आर्य विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

शहरात कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी, पालिका कर्मचारी व समितीच्या साधकांनी स्वच्छतेचे फलक हाती घेऊन या रॅलीत सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीच्या माध्यमातून नागरीकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. घराचा परिसर स्वच्छ ठेवा, घरातील केरकचरा घंटागाडीत टाका, व्यापाऱ्यांनी दुकानातील कचरा घंटागाडीत टाकावा, प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद करण्याचे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...