आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी विधानसभा मतदार संघात शेती सिंचनासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्याने 37 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या 24 बंधाऱ्यांना मान्यता मिळाली असून पुढील काही दिवसांतच बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात का होईना मार्गी लागणार आहे.
कळमनुरी विधानसभा मतदार संघात शेती सिंचनासाठी बंधाऱ्याची आवश्यकता होती. नदी, नाल्यांचेे पाणी साठवून न राहता वाहून जात असल्याचे त्याचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे नदी, नाल्यांवर बंधारे घेऊन शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली होती.
दरम्यान, शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार बांगर यांनी मृद व जलसंधारण विभागामार्फत बंधाऱ्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले होते. त्यानंतर आमदार बांगर यांनी पाठपुरावा करून या कामांना मान्यता मिळवून घेतली आहे. यामध्ये कोल्हापूरी बंधारे व साठवण बंधाऱ्याच्या कामांचा समावेश आहे.
यामध्ये बोरी शिकारी (1.80कोटी), खापरखेडा (1.38 कोटी), पोतरा (1.40कोटी), धोतरा (1.78 कोटी), बाभळी (1.70कोटी), गांगलवारी (1.79कोटी), पांगरा तर्फे लाख (1.34कोटी), जांभळीतांडा (1.35कोटी), नंदगाव दोन बंधारे (3.11 कोटी), बोल्डा (1.61कोटी), सालेगाव (1.80कोटी), कुर्तडी (1.65 कोटी), सिंदगी (1.64कोटी), कांडली (1.61कोटी), येहळगेगाव गवळी (1.69कोटी), बीबगव्हाण (77.68लाख), कनका (1.56कोटी), राजुरा (1.43कोटी), खानापूर (1.80कोटी), जडगांव (2.50 कोटी ) या कोल्हापूरी बंधाऱ्याचा समावेश आहे.
यासोबतच पाझरतांडा (50.65 लाख), जामगव्हाण (71.20लाख), असोला तर्फे लाख (69 लाख), या साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांच्या कामांना लवकरच सुरवात केली जाणार असून कोल्हापूरी व साठवण बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शिवाय शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.