आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस जळून नुकसान:कळलावी शिवारात शॉर्टसर्किटने उसाचे पीक जळून मोठे नुकसान

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील कळलावी शिवारात शॉर्टसर्किटमुळे सुमारे एक एकर क्षेत्रावरील ऊस जळून नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (३ नोव्हेंबर) दुपारी घडली. शेतातील उसाच्या पिकावरून गेलेल्या वीजवाहिन्या शॉर्टसर्किटमुळे तुटून पडल्याने हा प्रकार घडला. वसमत तालुक्यातील कळलावी शिवारात गुलाब चव्हाण यांचे शेत आहे. या ठिकाणी एक एकर क्षेत्रावर त्यांनी उसाची लागवड केली होती. सध्या ऊस तोडणीला आला असून काही दिवसांतच तोड होणार होती. मात्र आज दुपारी शेतातील उसाच्या पिकावरून गेेलेल्या वीजवाहिन्यांमध्ये स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या. त्यामुळे उसाच्या पिकाने पेट घेतला.

बातम्या आणखी आहेत...