आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:नैराश्य अन् कामाच्या ताणामुळे बँक व्यवस्थापकाची आत्महत्या, जवळाबाजार येथील एसबीआय शाखेत हाेते कार्यरत

हिंगाेली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ) येथील एसबीआय शाखा व्यवस्थापक प्रकाश यादवराव सरकटे (४०, सागवन, जि. बुलडाणा) घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यांना मानसिक तणाव असल्याचे पत्नी कल्पना यांनी पोलिसांना सांगितले.

प्रकाश हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यांच्यावर तज्ज्ञांकडून औषधोपचारदेखील सुरू होते. बुधवारी (१ फेब्रुवारी) मध्यरात्री प्रकाश हे लघुशंकेच्या बहाण्याने उठले. ते न परतल्याने पत्नीला शंका आली. त्यांनी बाजूच्या खोलीत पाहिले असता प्रकाश यांनी झोक्याच्या दोरीचा गळफास घेतलेले दिसून आले.

बँकेच्या कार्यक्षेत्रात ८५ गावे अन् पाच कर्मचारी
जवळाबाजार स्टेट बँकेत परिसरातील ८५ गावांमधून व्यवहार हाेतो. बँकेत २ अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना कामाचा गाडा ओढावा लागत होता. याचाही ताण त्यांना आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...