आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतोष बांगर तुझा बाप VIDEO:शिंदे गटाच्या समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांना धमकी; उद्धव ठाकरेंनी दिला धीर

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणाने किती खालची पातळी गाठलीय, दिवसेंदिवस त्याचे स्वरूप कसे खुनशीपणाकडे वळते आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना राजीनामा द्या, अशी मागणी करणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय.

बांगर समर्थकाने ही शिवीगाळ केल्याचे या ऑडिओ क्लीपमधून समजते. मात्र, या ऑडिओ क्लीपची दिव्य मराठी डिजिटल पुष्टी करत नाही.

कुठून झाली सुरुवात?

शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांची गाडी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शिवसैनिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओके...अशी नारेबाजी केली. तर काही शिवसैनिक त्यांच्या गाडीवरही चढले होते.

पोळ यांचा इशारा

अयोध्या पौळ यांनी बांगर यांच्या गाडीवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. त्यात त्यांनी आमदार संतोष बांगर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. बांगर यांनी तुम्ही हेमंत पाटील यांची गाडी फोडणार. माझी गाडी फोडणार. माझी गाडी तुमच्या घराच्या खाली आणून उभी करतो. तिला साधे खरचटले तरी राजीनामा देतो, अशी घोषणा केली होती.

अन् फोनवरून दिली धमकी

मात्र, अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी येथे बांगर यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर अयोध्या पौळ यांनी गद्दार आमदार संतोष बांगर आपल्या आमदारकीचा राजीनामा कधी देताय?, असा सवाल फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून केला होता. अयोध्या पौळ यांच्या या व्हिडीओ पोस्टनंतर आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाने त्यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच संतोष बांगर तुझा बाप आहे, तू हिंगोलीत येऊन दाखव, अशी धमकीही दिली आहे.

ठाकरेंनी केला फोन

अयोध्या पौळ यांना धमकी दिल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून धीर दिला. यावेळी अयोध्या यांनी, जेव्हापासून ही गद्दारी झाली तेव्हापासून रोज प्रॉब्लेम आहे, अशी चिंता व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. विशेष म्हणजे डिवचून-चिडवून तुला चूक करायला लावतील. तसे काही करू नको. सोबत कोणी सैनिक वैगेरे असतात का, अशी विचारणा केली. यावेळी अयोध्या यांनी मी मुंबईत मी एकटीच असते. बाकी सगळे परभणी जिल्ह्यात पालममध्ये असतात. मी भायखळ्यात राहते. २३ व्या मजल्यावर रेकी करण्यासाठी काही मुलींना ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे यांनी तू मुंबईत असतेस तर मी पोलिस आयुक्तांना सांगतो. त्यांच्याकडे सुद्धा रितसर तक्रार करून ठेव, असे सांंगितले.

बातम्या आणखी आहेत...