आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रामध्ये विरोधात असलेले राज्यात सत्तेत आहेत तर राज्यात विरोधात असलेले केंद्रात सत्तेत आहेत. दोन्ही विरोधकांना त्यांची भूमिका नीट पार पाडता येत नाही. त्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनामध्ये नुराकुस्तीचा खेळ असल्याचा संशय दिसून येत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवारी (दि.1) हिंगोलीत केला.
केंद्राला महागाईवर चर्चा नको
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की केंद्र सरकारला पेट्रोल, डिझेल, गॅस, खत व इतर महागाईवर चर्चा नको आहे. तर राज्यात शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा भारनियमन विजेचा लपंडाव शेतकरी आत्महत्या यावर राज्यशासनाला चर्चा नको आहे. त्यामुळे केंद्रात व राज्यात असलेले विरोधक त्यांची भूमिका स्पष्टपणे पार पाडू शकत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगली व्यक्ते आहेत याबद्दल दुमत नाही. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राज ठाकरे रान का उठवत नाहीत असा प्रश्नही त्यांनी केला.
ज्यात सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही पाणी आहे पण विजया भावी अडचणी येत आहेत भारनियमन होत आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी भोंगे व हनुमान चालीसा यावरच प्रश्नावर चर्चा होऊ लागली आहे. राज्यात पूर्वी आर्थिक व इतर समस्यांवर चर्चा होत होत्या मात्र आता त्याला जातीयवळण दिले जात असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.
महाविकास आघाडी सरकार अपयशी
महाविकास आघाडीचे सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास महा विकास आघाडी अपयशी ठरल्यामुळे आपण त्यातून बाहेर पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.