आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण केंद्रासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर:"लायगोे'साठी स्वाराती विद्यापीठ करणार कुशल मनुष्यबळ निर्मिती

हिंगोली / मंगेश शेवाळकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा येथे सुरू होणाऱ्या लायगो इंडिया या अांतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर तातडीने प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा शिवारामधील सुमारे १९१ हेक्टर जागेवर गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा सुरू होणार आहे. भारतातील ही पहिलीच प्रयोगशाळा असणार आहे. त्यासाठी जागा संपादनाची कामे पूर्ण झाली असून या प्रयोगशाळेत येणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हिंगोली शहरालगत स्वतंत्र वसाहत उभी केली जाणार आहे.

मागणीनुसार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार
लायगो प्रयोगशाळेसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाकडे पाठवला. प्रयोगशाळेच्या समन्वयातून प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल. मागणीनुसार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. या भागातील उद्योगधंद्यासाठीही कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची मदत होईल.
- उद्धव भोसले, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

बातम्या आणखी आहेत...