आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमतच्या बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह सापडला:माहूरजवळ झाडाला ते फासावर लटकलेले आढळल्याने खळबळ

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथून बेपत्ता झालेल्या शिक्षकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत माहूर जवळ उखळी घाटामध्ये रविवारी (ता. 15) सकाळी आढळून आला आहे. याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक रिठे यांनी सांगितले.

वसमत येथील मयूरनगर भागातील रहिवासी बबन किशनराव डाढाळे (56) हे शुक्रवारी (ता. 13) सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद शाळेत जातो असे सांगून स्कुटी वरून घरून निघाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता.

शाळेमध्ये चौकशी केली असता त्यांना शाळेतही माहिती मिळाली नाही. त्यामुळे रसिका डाढाळे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यावरून पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. पोलिसांनी याबाबतची माहिती हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना कळवली होती.

दरम्यान आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माहूर जवळील उखळी घाटामध्ये एक मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रिठे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली सदर मृतदेह वसमत येथील बबन डाढाळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याबाबतची माहिती डाढाळे यांच्या कुटुंबीयांना दिली आहे.

याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक रिठे यांनी सांगितले. मयत बबन डाढाळे हे वसमत तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...