आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडरोमिअोंना जमावाने बेदम चोपले:विद्यार्थिनींची काढली छेड; तिघांना बेदम चोप

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते औंढा मार्गावर दिग्रस पाटीजवळ विद्यार्थिनींची छेड करणाऱ्या तीन रोडरोमिअोंना जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथून शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर काही विद्यार्थिनी मानव विकास मिशनच्या बसने औंढा नागनाथकडे निघाल्या होत्या. यावेळी लिंबाळा येथून एका दुचाकीवर असलेल्या तीन रोडरोमिअोंनी दुचाकीवर येत बसचा पाठलाग सुरू केला. बस जवळ गेल्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना अश्लील टोमणे मारले. विद्यार्थिनींनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. दरम्यान, डिग्रस पाटीजवळ विद्यार्थिनी बसमधून खाली उतरल्यानंतर तिघांनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने त्यांना बेदम झोडपले. याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आर.एन.मळघने, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार अशोक धामणे, आकाश पंडितकर, संतोष वाठोरे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हिंगोली ग्रामीण ठाण्यात जमाव जमला होता.

बातम्या आणखी आहेत...