आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:आरोपीने इंस्टाग्रामवरुन मुलीशी केली होती मैत्री, हिंगोलीत आरोपीवर गून्हा दाखल

हिंगोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्राम वर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला हिंगोली व इतर ठिकाणी सोबत घेऊन अत्याचार करणाऱ्या तरुणा विरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी ता. 3 रात्री उशिरा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील अशपाक पठाण या तरुणाची परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर त्यांचे दूरध्वनीवरून संभाषण होऊ लागले. या ओळखीचा गैरफायदा घेत अशपाक पठाण याने त्या मुलीला पालम तालुक्यातून चारचाकी वाहनाद्वारे हिंगोली येथे आणले. त्यानंतर मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. अमरावती येथेही सोबत नेऊन त्याने अत्याचार केला.

आरोपीवर केला गुन्हा दाखल

या प्रकारानंतर त्या तरुणीने अमरावती सीटीकोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अशपाक पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची घटनास्थळ हिंगोली असल्यामुळे अमरावती पोलिसांनी सदर गुन्हा हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला. त्यावरून पोलिसांनी अशपाक पठाण याच्याविरुद्ध मंगळवार ता.3 रात्री उशिरा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.एन. मळघने, उपनिरीक्षक यामावार पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...