आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वाढोणा शिवारात विहिरीमध्ये आढळला बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह, मृत्यूबाबत तर्कवितर्क

प्रतिनिधी | हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील वाढोणा शिवारामध्ये एका विहिरीत एका व्यक्तीचा मृत्यदेह पोत्यात बांधून फेकलेल्या अवस्थेत शुक्रवारी ता. 25 दुपारी आढळून आला आहे. या व्यक्तीची ओळख पटली असून शिवाजी काटकर (रा. पानकनेरगाव) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील वाढोणा शिवारामध्ये एका विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक गणेश राठोड, जमादार महादु शिंदे, तुळशीराम वंजारे, शेख खुद्दुस, सतीश नरवाडे, संदीप पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यामध्ये एका पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले. परिसरात शोध घेतल्यानंतर सदर मृतदेह सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील शिवाजी काटकर या व्यक्तीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाजी काटकर हे ता.15 फेब्रुवारी पासून बेपत्ता होते. याबाबत सेनगाव पोलीस ठाण्यात नोंदही असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरू झाले असून त्यांचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत टाकला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...