आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ:कानोसा शिवारातील कालव्यात आला वाहून; पोलिसांचा तपास सुरू

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली वसमत तालुक्यातील कानोसा शिवारातील कालव्यात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कुरुंदा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसापूर धरणाचा डावा कालवा वसमत तालुक्यातून जातो. या कालव्याद्वारे सध्या पिकांसाठी तसेच पिण्यासाठी पाणीपाळी सोडण्यात आली आहे. त्यामुळे कालवा पाण्याने भरुन वाहू लागला आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहासोबत एक मृतदेह वाहून येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम आम्ले, बाभळे, शेख महेबुब यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह कालव्याबाहेर काढला आहे. मृतदेहाच्या अंगावर पिवळा टीशर्ट असून उजव्या कानात बाळी आहे. मृतदेहाचे वय सुमारे 20 ते 30 वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, इसापूर धरणाचा कालवा आखाडा बाळापूर कडून या परिसरात वाहतो. त्यामुळे सदर मृतदेह आखाडा बाळापूर परिसरातूनच आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीच्या नोंदीची माहिती घेतली जात असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...