आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला काँग्रेसच्या विचारांची गरज:माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंचे वक्तव्य; अशोक चव्हाणांबद्दल अफवा सुरू

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देशात सुरु असलेल्या अस्थितरेमुळे प्रत्येकाची मने दुभंगली असून देशाला काँग्रेसच्या विचारांची गरज असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी ता. ७ येथे व्यक्त केले.

येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, भाजपाच्या धोरणामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील नागरीकांची आपसात मन तुटलेली असून त्यासाठी भाजपाच जबाबदार आहे. देशात यापेक्षाही अस्थिर वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून होत असून त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतजोडो यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेची मने जोडण्याचा प्रयत्न आहे. काही जण या यात्रेला काँग्रेस जोडो यात्रा असे म्हणून संबोधत आहेत. मात्र विरोधकांनी सुरु केलेला हा अपप्रचार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून 15 दिवस हि यात्रा जाणार आहे. सध्या जळगाव जामोद व नांदेड येथे काँग्रेसनेते राहूल गांधी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आणखी काही सभांची वाढ होऊ शकते. या यात्रेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून यात्रा आपल्या जिल्ह्यात कधी येणार याची उत्सूकता पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागली आहे.

राज्यात काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकी चांगल्या पध्दतीने पार पडल्या असून जिल्हा व तालुकास्तरावर पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही काही जण संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत हे कसे म्हणत आहेत हे कोडेच आहे. त्यांनी कोणत्या जिल्हयात जाऊन पाहणी केली हे काळायलाही मार्ग नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा असून विरोधकांकडून या अफवा पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने त्यांना भरभरून दिले आहे त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत.

हिंगोली जिल्हयातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पक्ष बदलावर त्यांनी काहीजण अमिषाला बळी पडून पक्ष बदलत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

बातम्या आणखी आहेत...