आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण:विभागात 35 लाख हेक्टरवर पिकाला मिळाले विमा कवच

मंगेश शेवाळकर | हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पीक विमा योजनेत विमा काढण्याची मुदत संपल्यानंतर मराठवाड्यातील ६६.३० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरून ३५.२१ लाख हेक्टर संरक्षित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पीक विम्यापोटी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ३८९.४५ कोटी रुपयांचा भरणा केला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लातूर वगळता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

मराठवाड्यातील मागील काही वर्षात अवकाळी पाऊस, तसेच पावसाने उघडीप देण्याचे प्रकार घडल्यामुळे पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना विमा रकमेची मदत शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाला असून सोयाबीनच्या पिकाची वाढ नसतानाही आता फुले लागत असल्याने त्याचा पीक उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागासोबतच महसूल विभागानेही केले आहे. त्यानुसार ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत ६६.३०५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. विविध पिकानुसार शेतकऱ्यांनी १७,४९६ कोटी रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली असून त्यासाठी ३८९.४५. कोटी विमा हप्ता भरला आहे.

शेतकऱ्यांनी ३८९.४५ कोटींचा केला भरणा
लातूरमध्ये विमा भरणारे कमी

लातूर जिल्ह्यातील ७६ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. मागील वर्षी लातूर जिल्ह्यातील ९.६८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र या वर्षी ७.३७ लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विमा भरणारे शेतकरी
जिल्हा शेतकरी किती
हेक्टरसाठी

औरंगाबाद ७.२८ ३.११
जालना ७.४२ ३.१७
बीड १६.४८ ६.२७
लातूर ७.३७ ५.०१
उस्मानाबाद ६.६८ ५.०१
नांदेड १०.५९ ६.२३
परभणी ६.६५ ४.२१
हिंगोली ३.८० २.१६

बातम्या आणखी आहेत...